Home National गट नंबर 193 च्या जमिनीवर वाद – चुकीच्या नकाश्यावरून मोजणीचा आरोप; गाढवे...

गट नंबर 193 च्या जमिनीवर वाद – चुकीच्या नकाश्यावरून मोजणीचा आरोप; गाढवे परिवाराची न्याय मागणी

0

दडसवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली)/पुणे, 30 ऑक्टोबर :
दडसवाडी उबरगाव (पो. दिघची) येथील गट नंबर 193 मधील जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दत्तात्रय आंबा गाढवे यांच्या नावावर नोंद असलेल्या 118 गुंठे क्षेत्रफळाच्या जमिनीची मोजणी चुकीच्या नकाश्यावरून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जमिनीची आतापर्यंत दोनदा सरकारी मोजणी झाली आहे. पहिली मोजणी जुन्या नकाशाच्या आधारे झाली होती. मात्र गट नंबर 194 आणि 195 चे धारकांनी ती मोजणी मान्य केली नाही. त्यानंतर गट 194 चे मालकांनी नव्याने मोजणी करून नवीन नकाशा तयार करून घेतला. असा आरोप आहे की या नव्या नकाशात चुकीचे मोजमाप दाखवून गट नंबर 194 चा काही भाग गट नंबर 193 च्या सीमेतील दाखवण्यात आला आहे.

दत्तात्रय आंबा गाढवे यांचे म्हणणे आहे की त्यांची जमीन एकूण 118 गुंठ्यांची असून ती 7 ते 8 भागांमध्ये विभागलेली आहे. त्यांच्या जमिनीचा मूळ फ्रंट 118 ते 119 फूट इतका असताना नव्या मोजणीत तो फक्त 77 फूट दाखवण्यात आला आहे. गाढवे परिवाराचा आरोप आहे की हा प्रकार हा गट 194 च्या धारकांनी केलेल्या अतिक्रमणाचा परिणाम आहे.

गाढवे परिवाराने सांगितले की मोजणीदरम्यान वकिलाकडून निष्काळजीपणा झाला असून सर्व फी वेळेवर भरूनही योग्य प्रतिनिधित्व झाले नाही. सध्या हा प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे.

परिवाराने प्रशासन व न्यायालयाकडे मागणी केली आहे की जुन्या “शिल्लिंगर नकाशा”च्या आधारे खरी सीमा निश्चित करून योग्य न्याय मिळावा आणि वस्तुस्थिती समोर यावी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version